Corona updates : चिंता वाढली! एकट्या मुंबईत २४ तासांत आढळले ८०८२ कोरोना बाधित, सक्रिय रुग्णसंख्या ३७,२७४ वर

Corona updates : कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन यामुळे राज्य सरकार चिंतित आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतची शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या जोडीला नाइट कर्फ्यूही लागू आहे. तथापि, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढच पाहायला मिळत आहे. आजच्या अपडेटनुसार एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत 8082 रुग्णांची नोंद झाली आहे. Corona updates Total 8082 New Corona patients Found in Mumbai in last 24 Hours


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन यामुळे राज्य सरकार चिंतित आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतची शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या जोडीला नाइट कर्फ्यूही लागू आहे. तथापि, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढच पाहायला मिळत आहे. आजच्या अपडेटनुसार एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत 8082 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत 8082 कोरोना रुग्णांची वाढ

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण आज झपाट्याने वाढत आहेत. मागच्या 24 तासांत येथे 8082 रुग्ण नव्याने आढळले असून यामुहे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 37274 वर गेली आहे. दुसरीकडे, याच काळात 622 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर 138 दिवसांवर आहे, तर कोरोना वाढीचा दर 0.50 टक्के नोंदवण्यात आला आहे.

भारतात तिसरी लाटेची सुरुवात

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये भारतात तिसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. अशा वेळी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा त्रास वाढवू शकतो. केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा इशाराही भारतासाठी मोठा धोका आहे.

ओमिक्रॉनचे एकूण 1700 रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनची एकूण 1700 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 639 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 510, त्यानंतर दिल्लीत 351, केरळमध्ये 156, गुजरातमध्ये 136 तर तामिळनाडूमध्ये 121 प्रकरणे नोंदवली गेली.

Corona updates Total 8082 New Corona patients Found in Mumbai in last 24 Hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात