सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह, नागपूरात हॉस्पिटलमध्ये दाखल


विशेष प्रतिनिधी 

नागपूर : नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. Corona to Sarsanghchalak Mohan Bhagwat

आरटीपीसीआर करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे डॉ. मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भागवत यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.  लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.

Corona to Sarsanghchalak Mohan Bhagwat

हे ही वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात