काेराेनाकाळात महाराष्ट्राला २४३ काेटींचा सायबर गुन्हेगारांकडून गंडा


 विशेष प्रतिनिधी

पुणे -अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात डिजीटल आर्थिक व्यवहारात माेठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन बँकिंग, डेबीट, क्रेडीट कार्ड फसवणुक, हॅकिंग आदी माध्यमातून सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. काेराेनाकाळात लाॅकडाऊन असल्याने बाजारपेठ, कंपन्या बंद असल्याने नागरिक घरीच अडकून पडले. नियम शिथिल हाेऊन नागरिक पूर्ववत दैनंदिन व्यवहाराकडे परतत असतानाच मात्र, सायबर गुन्हेगारांनी संधीचा फायदा घेत मागील दाेन वर्षाच्या काळात राज्यातील नागरिकांना २४३ काेटी ६१ लाख २६ हजार रुपयांचा गंडा घातल्याची बाब महाराष्ट्र सायबर पाेलीसांच्या तपासात समाेर आली आहे. सदर रकमेपैकी केवळ सहा काेटी २८ लाख ३५ हजार रुपये पाेलीसांना तपासा दरम्यान परत मिळून आले आहे. Corona period cyber fraud increase in Maharashtra, 243cr amount stolen by online cheating cases

काेराेनाकाळात आयटी कंपन्यासह विविध कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम हाेम’ करावे लागले असून ऑनलाईन व्यवहारात त्यामुळे वाढ झाली आहे. केवळ शहरात माेठया प्रमाणात हाेणारे सायबर गुन्हेगारीचे लाेण यादरम्यान ग्रामीण भागापर्यंत पाेहचले आहे.ऑनलाईन शाॅपिंग, ऑनलाईन बँकिंग, क्रेडीट, डेबीट कार्डद्वारे हाेणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील १५ विभागात सन २०२० मध्ये ८७ काेटी ७१ लाख २० हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळया कारणांनी ऑनलाईन पध्दतीने लंपास केली. त्यापैकी केवळ ९७ लाख ५१ हजार रुपये पाेलीसांना परत मिळून आले आहे. लाॅकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मात्र, सायबर चाेरटयांनी ऑनलाईन गुन्हेगारीत दुपटीने वाढ केल्याचे दिसून येत आहे. २०२१ मध्ये १५५ काेटी ९० लाख पाच हजार रुपयांवर सायबर भामटयांनी डल्ला मारला असून त्यातील फक्त पाच काेटी ३० लाख ८३ हजार रुपये परत मिळून आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पाेलीसांनी दिली आहे. त्यामुळे दाेन वर्षाच्या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी चाेरी केलेल्या २३७ काेटी ३२ लाख ९० हजार रुपयांचा शाेध घेणे पाेलीसां समाेरील आव्हान बनले आहे.

गुन्हयांचे प्रमाण माेठे परंतु दाखल कमी

महाराष्ट्रात सन २०२० आणि २०२१ मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी), भारतीय दंड विधान संहिता (भादंवि) कलमांनुसार एकूण आठ हजार १४५ गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी एक हजार ५८५ गुन्हे उघडकीस आले असून दाेन हजार १५६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. तर, एक हजार ३२ गुन्हयांचा तपास करत सायबर शाखेच्या पाेलीसांनी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. परंतु त्यापैकी केवळ २९ गुन्हयात आराेपींना आतापर्यंत शिक्षा झालेली असून ४५ केसेसची न्यायालयीन सुनावणी पूर्ण झालेली आहे. राज्यातील मुंबई,पुणे, ठाणे, अमरावती, जळगाव, नागपूर, नाशिक,बीड, नवी मुंबई माेठया आदी शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असून केवळ पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण असा पुणे जिल्हयाचा विचार करता एक वर्षात सुमारे ४० हजार सायबर गुन्हे घडल्याच्या तक्रारी पाेलीसांना प्राप्त झाल्या आहे. मात्र, घडलेल्या गुहन्यांपेक्षा केस दाखल हाेण्याचे प्रमाण कमी असल्याचे ही दिसून येत आहे.

तंत्रकुशल प्रशिक्षण आवश्यक

राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काेटयावधी रुपये खर्च करुन महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यरत करण्यात आला आहे. राज्यात सायबर गुन्हेगारी माेठया प्रमाणात वाढत असल्याने तपासाचे अाणि गुन्हेगारांना शिक्षा हाेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे राज्यभरातील सायबर पाेलीस ठाणे आणि सायबर प्रयाेगशाळा सक्षम करणे आवश्यक असून तंत्रकुशल पाेलीस कर्मचारी तयार करण्यासाठी त्यांना अद्यावत प्रशिक्षण आणि पायाभूत साेयीसुविधा देणे गरजेचे आहे. त्याचसाेबत दाेषसिध्दता वाढण्याकरिता न्यायालयातही याेग्यप्रकारे पुरावे सादर करत पाठपुरावा करणे अावश्यक आहे.

अशाप्रकारे घ्यावी नागरिकांनी काळजी

  • अनावश्यक खासगी माहिती,फाेटाे अपलाेड करु नका
  • – क्रेडीट, डेबीट कार्ड, बँक खाते माहिती शेअर करु नका
  • – ऑनलाईन बँकिंग करताना सुरक्षितता बाळगा
  • – सहज ओळखता येणारा पासवर्ड ठेऊ नका, पासवर्ड बदलत रहावा
  • – आक्षेपार्ह ईमेल, लिंक ओपन करु नका
  • – सायबर फसवणुक हाेताच तात्काळ पाेलीसांकडे तक्रार दाखल करा

Corona period cyber fraud increase in Maharashtra, 243cr amount stolen by online cheating cases

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात