प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावात राष्ट्रवादी हा शब्द जरी असला तरी तो राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांना राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, अशात तिखट शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड प्रत्युत्तर दिले आहे.Considering the height of the winds and the place of national politics, the new generation should speak
शरद पवारांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणातले त्यांचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने संयमाने बोलले पाहिजे, असे बोल अजित दादांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील स्थान याबाबत त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचे दिसून आले. फडणवीस भाजपचे गोवा प्रभारी आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढत आहेत. काँग्रेसने त्यांना आपल्या आघाडीचा स्थान दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राष्ट्रवादी मूळातच पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे आणि थोडा इतर महाराष्ट्रात पसरलेला पक्ष आहे.
मुख्यमंत्री तर जाईनात अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचीही दांडी, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाची राज्यांसोबत बैठक
त्या पक्षाच्या नावात जरी राष्ट्रवादी हा शब्द असला तरी राष्ट्रीय पातळीवर त्याचे अस्तित्व नाही, अशा शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले होते. नावातच नुसते राष्ट्रवादी आणि गल्लीत येऊन राजकारण करावे लागते एवढाच साडेतीन जिल्ह्यात कोणता पक्ष मर्यादित असल्याचेही ते म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की राजकारणाविषयी बरेच बोलता येईल. परंतु शरद पवार यांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने संयमाने बोलले पाहिजे. राज्यातल्या अनेक मुद्द्यांवर मी परखड उत्तरे देऊ शकतो. देशपातळीवरच्या राजकारणासंबंधी प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि खासदार सुप्रिया सुळे या उत्तर देतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App