गोव्यात महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या प्रयोगाला काँग्रेसचा कोलदांडा!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेसच्या बळावर गोव्यात राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला ना काँग्रेस विचारते आहे, ना तृणमूल काँग्रेस विचारते आहे… त्यामुळे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना कोलदांडा बसला आहे…!! Congress scolds Shiv Sena’s experiment of Mahavikas Aghadi in Goa !!

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वतःहून पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. काँग्रेसला गोव्यात स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्यांचा तसा दावा आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसबरोबर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेसला आपण स्वबळावर सत्तेवर येऊ असे वाटत आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही, असे राऊत म्हणाले.



संजय राऊत यांनी गोवा प्रदेशात लक्ष घातले होते. त्यांनी याआधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली होती. दोघेही महाविकास आघाडीच्या प्रयोगाला अनुकूल असल्याचा दावा राऊत यांनी त्या वेळी केला होता. त्यानंतर त्यांनी गोव्यात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य नेत्यांनी बरोबर महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या वाटाघाटी केल्या होत्या. परंतु काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांना फक्त चर्चेपुरता प्रतिसाद दिला. काँग्रेस तेथे स्वबळावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन गोवा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी गोव्यात काँग्रेस तर फोडली आहेच पण राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनाही फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातले अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. शिवसेनेचा गोव्यात काहीही प्रभाव नाही. त्यांचा एकही सरपंच नसल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्याला चिडून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. आधी आमचे आमदार निवडून येतील मग सरपंच होत राहतील, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मदतीने गोव्याच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी पंक्चर केल्याचे दिसत आहे.

Congress scolds Shiv Sena’s experiment of Mahavikas Aghadi in Goa !!

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांचा तुरुंगवास, अनेक गंभीर आरोप

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : तपास सुप्रीम कोर्टाच्या ताब्यात; स्वतंत्र समितीद्वारे तपास; केंद्र आणि पंजाब सरकारांना स्वतपासास मनाई!!

वर्ध्यात घडली धक्कादायक घटना , पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर महिला होमगार्डने स्वतःवर रॉकेल ओतून घेतले जाळून

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात