काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस खाली खाली येतोय; कन्हैया, जिग्नेशमुळे उभारी – सुशीलकुमार शिंदे


विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या सहा वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात होते. पण त्यांनी कधी प्रवेश करण्याची भूमिका घेतली नाही. पण आता त्यांना काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे. आज काँग्रेस खाली खाली येत आहे. अशावेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

राजकारणात येण्यासाठी तरुणांना संधी दिली पाहिजे, असे सांगताना ते म्हणाले, मी राजकारणात येण्यापूर्वी सुशील कुमार शिंदे कोण हे कोणालाच माहीत नव्हते संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहित झालं की, सुशीलकुमार शिंदे कोण आहेत. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही तर ती त्यांनी घायची असते, असे देखील शिंदे यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम स्वीकारला आहे. त्यामुळे काँग्रेसची हिंदुत्ववादी भूमिका नाही. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना योग्यरित्या चालवता आली नाही म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र यावं लागलं. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. असे शिंदे यांनी सांगितलं.

  • सहा वर्षांपासून कन्हैया, जिग्नेश काँग्रेसच्या संपर्कात
  • काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षाला उभारी
  • काँग्रेस दिवसेंदिवस खाली खाली येत आहे.
  • राजकारणात येण्यासाठी तरुणांना संधी द्यावी
  • शिवसेनेबरोबर जाताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम
  • हिंदुत्ववादाचा आणि काँग्रेसचा संबध नाही

Congress party coming down day by day

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात