नाशिक : संपूर्ण देशभरात भारतीय जनता कोरोना मुक्त गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना ऐन गणेशोत्सवाच्या मध्यावर आज गौरी पूजनाच्या दिवशी काँग्रेसला मात्र महागाई विरुद्ध आंदोलन करण्याचा “राजकीय मुहूर्त” सापडला आहे. काँग्रेसचे आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर महागाई आणि बेरोजगारी विरुद्ध आंदोलन होणार आहे. या आंदोलनानिमित्ताने होणाऱ्या रॅलीला काँग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष खासदार राहुल गांधी संबोधित करणार आहेत.Congress Agitation against price rise and unemployment today, but what kind of benefit will it get??
सणवाराला नकारात्मक आंदोलन
देशात कोणत्याही सणाच्या काळात राजकीय पक्ष सहसा आंदोलन करत नाहीत. कारण सगळी जनता एकीकडे सण साजरा करण्यामध्ये मग्न असताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. एखादी आनंदोत्सवाची रॅली हा त्याला अपवाद ठरू शकतो. जसा शिवसेनेचा दसरा मेळावा अथवा मनसेची गुढीपाडवा रॅली यांना कायम चांगला प्रतिसाद मिळतो. पण सहसा कोणत्याच राजकीय पक्ष ऐन सणवाराच्या मध्यावर गौरी गणपती अथवा दिवाळीत नकारात्मक मुद्द्यांवर मोठे आंदोलन करण्याच्या फंदात पडत नाही. त्यातून पक्षाचा प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना असते.
काँग्रेसला भीती नाही
पण काँग्रेसला मात्र ही भीती वाटत नाही असे दिसते. कारण काँग्रेसने मात्र ऐन गणेशोत्सवाच्या मध्यावर त्यातही विशेषतः गौरी पूजनाच्या दिवशी जेव्हा सगळी जनता तब्बल दोन वर्षानंतर कोरोना मुक्त गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना महागाई आणि बेरोजगारीच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा मुहूर्त “राजकीय मुहूर्त” साधला आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना आपापली राज्ये सोडून दिल्लीच्या रामलीला मैदानावर मैदानावर आंदोलनात सहभागी व्हायचा आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी काढला आहे.
महागाई बेरोजगारी मुद्दे महत्त्वाचे… पण
महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे नाकारण्याचा इथे प्रश्नच नाही. हे मुद्दे नक्की महत्त्वाचेच आहेत. समस्याही गंभीर आहेत. पण अशा गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंदोलन देखील तितकेच तीव्र आणि गंभीर असले पाहिजे. त्यामुळेच ऐन गणेशोत्सवातला सणाचा मुहूर्त या आंदोलनासाठी निवडण्यामागे काँग्रेसने नेमके काय औचित्य दाखवले आहे??, हा प्रश्न पडला आहे. शिवाय ईद अथवा ख्रिसमसच्या दिवशी काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारी अशा मुद्द्यांवर आंदोलन केले असते का?? हा ही उपप्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहात नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App