मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण; वाचा सविस्तर..

CM Udhdhav Thackeray Help To Youth in Accident during His Pandharpur Visit For Vitthal Mahapooja

CM Udhdhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारी रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आठ तास गाडी चालवून पंढरपूर गाठले. तेथे पोहोचल्यानवर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत विकासकामांची आढावा बैठक घेतली. या प्रवासादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पंढरपूरच्या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाइकस्वारांचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची गाडी व रुग्णवाहिका त्या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. यामुळे या दोन्ही तरुणांचा जीव वाचला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारी रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आठ तास गाडी चालवून पंढरपूर गाठले. तेथे पोहोचल्यानवर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत विकासकामांची आढावा बैठक घेतली. या प्रवासादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पंढरपूरच्या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाइकस्वारांचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची गाडी व रुग्णवाहिका त्या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. यामुळे या दोन्ही तरुणांचा जीव वाचला आहे.

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे निवासस्थान मातोश्रीवरून पंढरपूरकडे रवाना झाले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोशीतील असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता तेथे दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांचे एक वाहन आणि रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेवर मिळाल्याने दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत.

शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मुख्यमंत्री असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या प्रसंगावधानाचे संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे.

CM Udhdhav Thackeray Help To Youth in Accident during His Pandharpur Visit For Vitthal Mahapooja

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात