आनंद महिंद्राचा सल्ला मुख्यमंत्र्यांना नाही रूचला ; नाव न घेता लगावला जोरदार टोला


  • राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचा इशारा दिला. पण, लॉकडाऊनची घोषणा मात्र केली नाही.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत आगामी दोन दिवसांत जर राज्यातल्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर कठोर पावलं उचलावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. CM Uddhav Thakrey replied to Aanand Mahindra

त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांना टोले लगावले आहेत .यात उद्योगपती आनंद महिंद्राच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता याबाबत टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.

याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता त्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. आरोग्य सेवांवर आपण भर देतच आहोत असं म्हणत यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचाही यावेळी विचार केला जाणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला.

‘हे जे सर्व सल्ले देत आहेत, उद्योगपती ज्यांनी आरोग्य व्यवस्था वाढविण्यास सांगितले त्यांना सांगतो,मला रोज 50000 डॉक्टर्सची सोय करा. तज्ज्ञ लोकं, डॉक्टर्स कुठुन आणायचे ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या राजकीय नेतेमंडळींनी जनतेच्या जीवाशी खेळू नये असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?

लॉकडाऊन ला मध्यमवर्गीय घटकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो, यामागचं कारणंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं होतं. ‘उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत.

मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया’, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

CM Uddhav Thakrey replied to Aanand Mahindra

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात