Dahi Handi : या वर्षीही गोविंदांची निराशाच! परवानगी नाकारल्याने भाजपचा ठाकरे सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा

CM Uddhav Thackeray Denied Dahi Handi Celebration in Mumbai and Maharashtra after meeting with Govinda Pathak

Dahi Handi : यावेळीही दही हंडीचा उत्सव महाराष्ट्रात साजरा होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक दहीहंडीला परवानगी दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 ऑगस्ट, सोमवार) राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या लोकांचे प्राण वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे सण (दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी) काही काळ बाजूला ठेवावे लागतील. CM Uddhav Thackeray Denied Dahi Handi Celebration in Mumbai and Maharashtra after meeting with Govinda Pathak


विशेष प्रतिनिधी

मुंबई : यावेळीही दही हंडीचा उत्सव महाराष्ट्रात साजरा होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक दहीहंडीला परवानगी दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 ऑगस्ट, सोमवार) राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या लोकांचे प्राण वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे सण (दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी) काही काळ बाजूला ठेवावे लागतील. दुसरीकडे, भाजप नेते आशिष शेलार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली तर राज्य सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आशिष शेलार यांचा आंदोलनाचा इशारा

आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी साजरी केल्याने मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो, असे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने कोरोनाचे कारण देऊन दहीहंडी उत्सव साजरी करण्याला परवानगी नाकारली आहे. मी मुख्यमंत्र्यांना दहीहंडीच्या विनवणी साठी फोन केला. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या तसेच जास्त उंच नसलेला पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव करू द्या, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे. जर दहीहंडीला परवानगी नाकारली तर सरकारच्याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी का नाकारली परवानगी

गोविंदा पथकांशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार प्रत्येक गोष्टीत पूर्ण सूट देऊ शकत नाही. सणांवरील निर्बंध शिथिल करावेत, अशी विरोधकांकडून सातत्याने मागणी होत आहे. गोविंदा पथकांचीही मागणी होती की, गर्दी वाढवणार नाही आणि कोरोना नियमांचे पालन करत दहीहंडी साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना काही काळ संयम बाळगण्याचे आवाहन केले.

‘सार्वजनिक सणांऐवजी आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा’

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “यावेळी लोकांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांचे प्राण वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे सण आणि उत्सव काही काळ बाजूला ठेवा. मानवता दाखवा आणि जगाला हा संदेश द्या की, कोरोनाला पराभूत करू, तेव्हा स्वस्थ बसू. मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना कोरोनाच्या काळात दही हंडीऐवजी आरोग्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.

राज्यात अनलॉकिंग सुरू झाल्यानंतर सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनशी संबंधित निर्बंधांमध्ये शिथिलता देत आहे. पण तरीही मंदिरांसह धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे भाजप आणि मनसेसारखे विरोधी पक्ष आक्रमक होत आहेत. आता राज्य सरकारच्या या पावलावर विरोधकांची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे.

CM Uddhav Thackeray Denied Dahi Handi Celebration in Mumbai and Maharashtra after meeting with Govinda Pathak

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात