स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे,अस विखे पाटील म्हणाले.CM should resign of navab malik – Vikhe Patil
विशेष प्रतिनिधी
अहदनगर : स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना दोष देण्याचे काम महाविकास आघाडीचे मंत्री करताहेत. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमध्ये थोडीही चाड शिल्लक असेल; तर त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
लोणी येथे ते पत्रकारांशी ते बोलत होते.विखे पाटील म्हणाले की , स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे. सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विखे पाटलांनी केली.
महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना.. अंगण वाकडे..’ अशीच झाली आहे. काहीही झाले तरी, केंद्राकडे बोट दाखवायचे . लसीकरण जास्त झाले तरीसुधा स्वतःची पाठ थोपटून घेतात. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतही राज्य सरकार दुजाभाव करीत आहे.
एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून लवकरच सत्य बाहेर येईल. त्यावेळी यांना पळता भुई थोडी होईल, अशी टिकाही विखे-पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
विरोधकांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली जात आहे. मात्र, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली पाहीजे, असेही मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App