वृत्तसंस्था
पुणे : पुण्यामध्ये लस मिळेना म्हणून एका रुग्णालयाने चक्क महापालिकेच्या डॅाक्टर अधिकाऱ्यांचे फोन नंबर जाहीर केले. त्या नंबरवर 200 फोन आल्यामुळे महापालिकेचे अधिकारी प्रचंड वैतागले आहेत. त्यांनी रुग्णालयाविरोधात अखेर तक्रार दाखल केली. citizen vaccination in Pune problem
पुण्यामध्ये लसी उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णालयात लसीकरण बंद आहे. नागरिक मात्र रुग्णालयांमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे वैतागून अखेर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयाने चक्क अधिकऱ्यांचेच फोन नंबर जाहीर केले. कोथरुड मधल्या या रुग्णालयात “ या केंद्रावर लस नाही.
सरकार, महापालिकेडून लस मिळत नसल्याने लसीकरण बंद आहे. अधिक चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा “असा बोर्ड लावला होता. या बोर्डवर या संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि फोन नंबर जाहीर केले होते. या अधिकाऱ्यांना लासीसाठी फोन यायला सुरुवात झाली.
वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला.तेव्हा या बोर्डमुळे हे फोन येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून चौकशी केली. दरम्यान वरिष्ठांकडे कारवाईची मागणी केली. संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना असे करू नये, असे समजावले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेही जाहीर केलेले असतातच.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App