प्रतिनिधी
पुणे : महानगरपालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. भाजपने गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. हे अधिकारी केंद्राला अहवाल दाखल करतील.CITF officials in Pune for interrogation of Kirit Somaiya case
सध्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, आणखी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा, यास्तव प्रयत्न करण्यात येणार आहे. सीआयएसएफचे जवान किरीट सोमय्यांसोबत होते.
त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी तक्रार केलीय की, आमच्या जवानानांही धक्काबुक्की झाली आहे. त्यामुळे केंद्राने थेट यामध्ये दखल घेतली आहे.पुणे महापालिकेच्या पायºयांवर शनिवारी किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.
सोमय्या हे महापालिकेत संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाच्या बनावट कंपनीविरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह दहा ते अकरा कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती. यावेळी सोमय्या पायºयांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App