Chitra Wagh : “आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा”, आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत.या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. Chitra Wagh: “Audit the health minister’s work and fire him”, Chitra Wagh attacks state government over fire accident

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, “भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते, असे सांगण्यात येते.

Chitra Wagh: “Audit the health minister’s work and fire him”, Chitra Wagh attacks state government over fire accident

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण