महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांचे पाच गट करून त्याप्रमाणे निर्बंधात शिथिलता देणाऱ्या अनलॉक मॉडेलसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे उद्योगपतींनी कौतुक केले आहे. देशात सर्वत्र हेच मॉडेल वापरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून सोमवारपासून लागू होणार आहे.Chief Minister Uddhav Thackeray’s unlock model was appreciated by the industrialists and appealed to implement it all over the country
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांचे पाच गट करून त्याप्रमाणे निर्बंधात शिथिलता देणाऱ्या अनलॉक मॉडेलसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे उद्योगपतींनी कौतुक केले आहे. देशात सर्वत्र हेच मॉडेल वापरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून सोमवारपासून लागू होणार आहे. राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून सोमवारपासून लागू होणार आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट करून उध्दव ठाकरे यांचे कौतुक करताना म्हटले आहे, महाराष्ट्रात उद्यापासून हटविण्यात येत असलेल्या लॉकडाऊन मॉडेलचं देशातील इतरही राज्यांनी अनुकरण करायला हवे. अतिशय समजूतदारपणे आणि शास्त्रीय पध्दतीचे हे महाराष्ट्र मॉडेल आहे.
लॉकडाऊन आणि नॉकडाऊनमधला हा सुवर्णमध्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. कोरोनालाही रोखायचे आहे अन् अर्थव्यवस्थेलाही मजबूत करायचे आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या या मॉडेलचे इतर राज्यांनीही अनुकरण करायला हवे.
मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनसंदभार्तील ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही कौतुक केले आहे. पारदर्शक, कृतीशील आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील. पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, बहुतांश जिल्ह्यात सोमवारपासून दुकाने उघडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App