मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात येणार… पण बसून बोलणार!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात येणार आहेत, पण ते बसूनच बोलणार आहेत.Chief Minister Uddhav Thackeray will join the legislature

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे तब्येतीच्या कारणास्तव आपल्याला बसून बोलण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. ही विनंती दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वीकारली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळात हजेरी लावून दोन्ही सभागृहांमध्ये बसूनच बोलणार आहेत.


Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? Mumbai Local बद्दल घोषणा करणार?


उद्धव ठाकरे यांचे मानेचे ऑपरेशन झाले आहे. त्यांची तब्येत तितकीशी स्थिर नाही. त्यामुळे मध्यंतरी ते घरातूनच कारभार बघत होते. काही दिवसांपूर्वी पासून ते मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजेरी लावू लागले आहेत तसेच मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले होते. परंतु, त्यांच्या तब्येतीची समस्या अजूनही त्यांना भेडसावते आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वेळच्या अधिवेशनात त्यांनी अजिबात हजेरी लावली नव्हती. परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते विधीमंडळात हजर राहणार आहेत. भाषण करण्याच्या वेळी ते बसूनच बोलणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray will join the legislature

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात