प्रतिनिधी
मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश या योजनेचा आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कुठे संपर्क साधायचा? याची माहिती अनेकांना नसते. पण आता एका मिस्ड कॉलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे.Chief Minister Relief Fund one missed call
मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत अनेकदा रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता एका मिसकॉलवर हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी 8650567567 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, आता वरील क्रमांकावर मिस्ड कॉलवर देताच तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत तब्बल 60 कोटींवर मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App