प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचा संतप्त अवतार पाहायला मिळाला. बेळगाव सीमा प्रश्नावर विरोधकांनी उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा एकनाथ शिंदे यांनी आक्रमकपणे खोडून काढला. सीमा प्रश्नी आम्ही जेल भोगली. 40 दिवस बेळगावच्या जेलमध्ये होतो. तेव्हा आत्ता सीमा प्रश्नावर बोलणारे कुठे होते??, असा संतप्त सवाल करून एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर तोफ डागली. Chief Minister Eknath Shinde’s angry question in the assembly
सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांचे आमदार विधानसभेत सरकार विरुद्ध आक्रमक झाले. विरोधकांच्या या आक्रमणाला परतवून लावताना एकनाथ शिंदे यांनी प्रतिआक्रमण केले. सीमा प्रश्नावर आता कोणी – कोणी ठराव केले??, त्याची सगळी माहिती पोलिसांकडून सरकारकडे आली आहे. यापैकी सीमा प्रश्नावर कोणी आंदोलन केले??, याचीही पक्की माहिती सरकारकडे आहे. पण प्रत्यक्षात सीमा प्रश्नावर आम्ही जेव्हा 40-40 दिवसांची जेल भोगली, तेव्हा सीमा प्रश्नावर आत्ता मोठमोठ्याने बोलणारे कुठे होते??, असा संतप्त सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र या तिन्ही ठिकाणी वर्षानुवर्षे कोणत्या पक्षांची सरकार होती??, त्यांनी सीमा प्रश्न मार्गी लावला नाही, याची साक्ष सगळ्या देशाची जनता देईल. पण केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांच्या बैठक घेतली सीमा भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्या स्पष्ट सूचना दिल्या. हे गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासात पहिल्यांदा घडले, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. पण गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा सीमा भागातल्या सगळ्या कल्याणकारी योजना बंद केल्या होत्या. धर्मादाय निधी देणे बंद केले होते. पण शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्याबरोबर सीमा भागात सगळ्या कल्याणकारी योजना आणि धर्मादाय निधी देणे सुरू केले, याकडे एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना विरोधी आमदारांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही गप्प बसा अशा आक्रमक शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना गप्प केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्र्यांनी आपण आक्रमकपणे विरोधकांचा हल्ला परतवू, याची चुणूक दाखवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App