प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा परिसरात समाजकंटकांनी गुरुवारी धुडगूस घातल्याच्या 24 तासांतच शहरालगतच्या ओव्हर गावात दोन गट आमने-सामने आले होते. गुरुवारी रात्री सुरू झालेल्या वादाचे शुक्रवारी सकाळी तुफान दगडफेकीत रूपांतर झाले. यात 10 ते 12 ग्रामस्थ जखमी झाले. Chhatrapati Sambhajinagar riots firing victim dies during treatment; 8 accused remanded till April 3
दरम्यान, किराडपुरा परिसरात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. दंगलप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अटकेतील 8 आरोपींची 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
किराडपुऱ्यात दंगलीनंतर पोलिसांच्या गोळीबारात जखमी शेख मुनिरुद्दीन मोइनुद्दीन (४५) यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, या दंगलीच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. दुसरीकडे, दंगेखोरांवर कठोर कारवाईबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App