छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच; भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांनी अजितदादांना घेरले

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी, विरोधकांनी एकमेकांवर जोरदार शरसंधान साधले. पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर देताना छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असा दावा केला होता. त्यावरून शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी अजितदादांना घेरले आहे. भाजप आमदार निलेश राणे यांनी एक ट्विट करुन अजित पवारांनाच थेट उत्तर दिले आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmavirach; Leaders of the BJP-Shinde group surrounded Ajit Dada

काय म्हणाले होते अजित पवार?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे म्हटले होते.

अजितदादांना त्यांच्याच ट्विट मधून उत्तर

निलेश राणे यांनी ट्विट करुन उत्तर दिले. ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांचेच 14 मे 2018 चे ट्विट पुढे आणले. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांना सवाल केले आहेत. निलेश राणेंनी अजित पवार यांचे जूने ट्विट समोर आणले. यात त्यांनी अजित पवारांच्याच काही जुन्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या ट्वीट्समध्ये अजित पवारांनीच छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’असा केल्याचे दिसते. या स्क्रीनशॉटमध्ये “धर्मवीर-धुरंदर राजकारणी, ज्यानं दुश्मनांचा उतरविला माज, ऐसे पराक्रमी आपुले राजे छत्रपती संभाजी महाराज, त्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा”, असे ट्वीट अजित पवारांनी केल्याचे दिसते.

देसाई, गोगावलेंनी खोडले दावे

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही अजित पवारांचा हा दावा खोडून काढला आहे. “मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी 40 दिवस त्यांचे हाल केले. संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी आपल्या देहाचे बलिदान केले. पण त्यांनी धर्म सोडला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचे नाही?, असा सवाल शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचे नाकारता येणार नाही.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते. औरंगजेबाच्या आणि मोगलांच्या छळामुळे त्यांनी धर्मांतर केले नाही त्यांनी धर्मासाठी बलिदान केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या अधिकृत पेजवरूनही अजितदादांच्या दाव्यावर टीका केली आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmavirach; Leaders of the BJP-Shinde group surrounded Ajit Dada

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात