खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने सात ते आठ तास वाहतूक विस्कळीत हाेण्याचा प्रकार घडला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –पुणे-मुंबई दुतगती महामार्गावर खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने सात ते आठ तास वाहतूक विस्कळीत हाेण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकारामुळे मुंबई ते पुणे बाजूच्या दाेन्ही लेनवर चार ते पाच किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक काेंडीमुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले. Chemical Tanker Sleeping near Amrutanjan Bridge khopoli area, traffic jam last seven to eight hours
शनिवारी सकाळी सहा वाजता केमिकल भरलेला एक टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेला जात हाेता. अमृतांजन पुलाजवळ आल्यानंतर घाटातील उतारावरच केमिकलचा टँकर अचानक पलटी झाला. त्यामुळे टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून उतारामुळे ते सर्वदूर पसरले आणि पांढरा मेणाचा थर सर्वत्र साचल्याने मुंबईला जाणारा रस्ता ठप्प हाेऊन वाहतूक काेंडी झाली. त्याचप्रमाणे महामार्गावर रसायन पसरल्याने अनेक वाहने घसरु लागली. त्यामुळे महामार्ग पाेलीसांनी लाेणावळा मधून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई रस्त्याला वळवली आणि लाेणावळा शहरात वाहनांच्या चार ते पाच किलाेमीटर पर्यंत रांगा लागल्या.
वाहतूक काेंडी नंतर वाढतच जाऊन लाेणावळा शहरापासून दहा ते बारा किलाेमीटर अंतरावर वाहनाच्या रांगा लागल्याने आणि धिम्या गतीने वाहतूक सुरु राहिल्याने प्रवाशांना सदर अंतर पार करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागला. दरम्यान, केमिकल सांडलेल्या ठिकाणी बारीक खडी व वाळू टाकून रसत्यावरील केमिकल बाजूला करण्याचा प्रयत्न देवदूत रेसक्यु टीम, आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी केला.
दरम्यान, वाहतूक काेंडीचा प्रश्न साेडविताना पाेलीसांची दमछाक हाेताना दिसून येत हाेती. शनिवार- रविवारच्या सुट्टीमुळे अनेक पर्यटक घराबाहेर लाेणावळा-खंडाळयाला जाण्यासाठी निघाले हाेते मात्र, वाहतूक काेंडीचा सामना त्यांना करावा लागला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App