शाईफेकीनंतर चंद्रकांतदादा पाटील आक्रमक; पोलिस प्रोक्टेक्शन काढून टाकतो, म्हणाले, हिंमत असेल तर समोरून या!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक केली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यानंतरही आज चिंचवड मध्ये त्यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आक्रमक झाले. Chandrakantada Patil is aggressive after ink throw

या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

“जी लोकं आंदोलन करत आहेत त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे. जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं आहे”, असं फडणवीस म्हणाले.



“चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य एवढंच होतं की, आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात पण त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जनतेतून पैसा उभा करुन शिक्षणाची व्यवस्था उभी केली. हा आशय महत्त्वाचा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने टार्गेट करणं चुकीचं आहे”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

चंद्रकांतदादा आक्रमक

चंद्रकांतदादा आक्रमक झाले. ते म्हणाले, की “मी पैठणला जे बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला. मी प्रचंड मोठ्या गर्दीत वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनात असं म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 100 मार्कांचा अभ्यासक्रम केला पाहिजे. दोन पानी धडा काय शिकवता?”

“पुढे जाऊन मी म्हणालो की, बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे 1000 वर्षे बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावं म्हणजे घटना. ते तुम्ही प्रेसवाल्यांनी नाही दाखवलं. माझा तुम्हाला दोष नाही. पण तुम्ही पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करुन महाराष्ट्र पेटवला, मी तुमच्यावर आरोप करत नाही. पण तुम्ही पराचा कावळा केला नसता तर असं घडलं नसतं.”

Chandrakantada Patil is aggressive after ink throw

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात