चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट ; म्हणाले – येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल

पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल.Chandrakant Patil’s assassination; He said that there will be a change of government in the coming new year


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर :विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांचा सोमवारी (दि.22) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, तसेच जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. याशिवाय जे अपक्ष लोकप्रतिनिधी असलेलेही भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य समजते, पुढे काय होणार हे कळत त्यांना कल्पना आहे की महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही.

पुढे पाटील म्हणले की येत्या नवीन वर्षात देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असेल. ही गोष्ट डोक्यात ठेवूनच अपक्ष उमेदवार भाजपसोबत आहेत. त्यामुळे विजयाची मॅजिक फिगर आम्ही पार करूच तसेच अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil’s assassination; He said that there will be a change of government in the coming new year