उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले


  • भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली. जनता ही फसवणूक खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.  Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray says he speaks Lieते मंगळवारी भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. तसेच येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला.

तसेच राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज आहे. देशात स्लीपर सेलचे लोक सक्रिय असल्याचे कोरेगाव-भीमाच्या दंगलीवेळी दिसून आले. त्यामुळे आपल्याला वैचारिक संघर्ष करावा लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray says he speaks Lie

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती