BIG BREAKING NEWS : वसुली प्रकरणात मोठी कारवाई, सीबीआयने नोंदवला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर , अनेक ठिकाणी छापे


  • अनिल देशमुखांच्या घरी छापा

  • राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरासह अनेक ठिकाणी छापेही मारण्यात आले आहेत. CBI files FIR against Anil Deshmukh over corruption allegation

100 कोटी वसुलीच्या आरोपामुळे खुर्ची गमावलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे आणि त्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापे मारत शोध मोहीम सुरू केली आहे.



अनिल देशमुख यांची चौकशी करण्यापूर्वी सीबीआयने रविवारी अनिल देशमुख यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकांची चौकशी केली. याशिवाय एनआयएच्या ताब्यात मुंबई पोलिसांचे निलंबित सचिन वाझे यांच्या दोन चालकांचीही एजन्सीने चौकशी केली आहे.

अनिल देशमुख यांची यापूर्वीही सीबीआयने चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांची खुर्ची गेली. सीबीआयने हायकोर्टाच्या आदेशावरून त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू केली आहे.

CBI files FIR against Anil Deshmukh over corruption allegation

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात