ठाकरे – राऊत – अंधारे : भाषा आक्रमक, भाषण तडाखेबंद; पण शिवसेनेतल्या गळतीला का नाही घालता येत पायबंद?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाषा आक्रमक, भाषण तडाखेबंद पण शिवसेनेतल्या गळतीला का नाही घालता येत पायबंद??, असा सवाल आज बुलढाण्यातल्या उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद मेळाव्यानंतर तयार झाला आहे. किंबहूना हा सवाल 40 आमदार फुटल्या नंतरच तयार झाला आहे, पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा सुषमा अंधारे यांनी दिलेले नाही. can only firery speeches by Uddhav Thackeray, Sanjay Raut and sushma andhare save Shivsena from further splits

शिवसेनेत 49 आमदार, 12 खासदार फुटल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले. बुलढाण्यातल्या शेतकरी मेळाव्या संवाद मेळाव्यात त्यांनी तडाखेबंद भाषणही केले. मिंधे गट, रेडे, बळी वगैरे भाषा आक्रमक भाषा वापरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदार, 12 खासदारांना ठोक ठोक ठोकून घेतले. राज्यपालांना काळी टोपी म्हणून त्यांच्यावर शरसंधान साधले. त्याआधी संजय राऊत यांनी देखील नेहमीप्रमाणे तडाखेबंद भाषण करून 40 रेडे तिकडे गुवाहाटीला नेले आहेत पण हा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र आहे. इथे रेड्यामुखी वेद बोलले जातात, असे सुनावले. तुमचे 40 आमदार, सरंजामदार विदर्भातल्या 40 लाख जनतेला कसे तोंड देणार?, असा तिखट सवाल करून घेतला.

पण संजय राऊत असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या नेत्या सुषमा अंधारेचा असोत, या तीनही नेत्यांची भाषणे तडाखेबंद होतात, भाषा आक्रमक असते. पण त्यांची लढाई मात्र स्वजनांशीच असते. म्हणजे शिवसैनिकांशीच असते. त्यांच्या टिकेचा बहुतेक भाग शिवसेनेतून फुटून निघालेले आमदारांरच खर्ची होतो. उरली सोडली सगळी ताकद या आमदारांविरोधातच लावावी लागते. मग अधून मधून भाजपवर घसरणे होत राहते, पण भाषणाचे मूळ टार्गेट मात्र 40 आमदारच राहतात. 

असे असूनही शिवसेनेत फूट पडण्याला पायबंद मात्र या तीनही नेत्यांपैकी कोणाला घालता आलेला दिसत नाही. शिवसेनेतून रोज कोणी ना कोणीतरी बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असल्याच्या बातम्या येतात. मग छोट्यातल्या छोट्या गावचा ग्रामपंचायत सदस्य असो की छोट्या नगरपंचायतीचा अध्यक्ष असो किंवा एखाद्या महापालिकेतल्या माजी नगरसेवक किंवा माजी नगरसेवकांचा गट असो, हे फुटल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात. पण शिवसेनेतून फुटून जाणाऱ्या एखाद्या नेत्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत अथवा सुषमा अंधारे यांनी रोखून दाखवले, अशा बातम्या येत नाही. याचा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आणि त्या नेत्यांना आपल्या पक्षाची गळती अजून तरी रोखता आलेली नाही आणि त्या गळतीला पायबंद कसा घालावा हे समजलेले दिसत नाही. किंवा समजले असेल तर प्रत्यक्ष तशी कृती करता येत नाही, असेच म्हणावे लागेल.

आज जेव्हा उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यात शेतकरी संवाद साधत होते, त्याच दिवशी नाशिक मधले 12 नगरसेवक शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्याच्या वाटेवर होते. त्यांना कोणताच शिवसेनेचा नेता फुटण्यापासून रोखू शकला नाही. शिवाय हे एकच उदाहरण नव्हे, अशी अनेक उदाहरणे आहेत. इतकेच काय पण एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्या दरम्यान शिवसेनेत आणखी काही फुटीची बीजे पेरल्या गेल्याच्या बातम्या आहेत. ही बीजे किंवा आणखीन दोन-चार आमदार दोन-तीन खासदार फुटणे अशा बातम्या आल्या आहेत. त्यांना कसे रोखणार? त्या फुटीला कसा पायबंद घालणार?, हे खरे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांपुढे आहे आणि फक्त भाषा आक्रमक वापरून आणि भाषण तडाखेबंद करून ते जमणार आहे का??, हा खरा प्रश्न आहे.

can only firery speeches by Uddhav Thackeray, Sanjay Raut and sushma andhare save Shivsena from further splits

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण