कॅडबरी खरेदी करण्यासाठी म्हणून आले आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार वानवडी आणि कोंढवा परिसरात घडला.Came to buy Cadbury and took out the pistol, intimidated and looted 12 thousand from the medical and hotel
विशेष प्रतिनिधी
पुणे – कॅडबरी खरेदी करण्यासाठी म्हणून आले आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार वानवडी आणि कोंढवा परिसरात घडला.
वानवडी येथील नॅन्सी टॉवरमध्ये असलेल्या वेलनेस फॉरेव्हर मेडिकल शॉपमध्ये दोन तरुण कॅडबरी खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. पिस्तुलाचा धाक दाखवून मेडिकलमधील पाच हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली. राजेश प्रकाश अलकोंडा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे सीसीटिव्ही वरून याच आरोपींनी कोंढवा येथील करीम हॉटेल येथून 7 हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याचे उघडकीस आले आहे.
https://youtu.be/y1ZE9iOXspQ
कोंढवा पोलिसांनी उमेश चंद्रकांत यादव (वय 29, रा. नाईन ग्रीन, हांडेवाडी) यांच्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे यादव यांच्या उंड्री चौकामध्ये असलेल्या स्वामी समर्थ मेडिकलमध्ये घुसले.
पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी साडेपाच हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. अशा प्रकारच्या आणखी दोन ते तीन घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App