प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडल्याचे वृत्त आहे. भाजप पक्षश्रेष्ठींशी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊन शनिवारी ३० जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.Cabinet expansion of Shinde-Fadnavis government: Discussion with BJP party leaders in Delhi, possibility of swearing-in of 30 people on Saturday
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी असला तरी मुख्यमंत्री ४ वाजताच दिल्लीत पोहोचले. त्यानंतर त्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली असून ते शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार करतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपचे २२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, तर शिंदे गटाला ४ आमदारांमागे एक मंत्रिपद या सूत्राने १३ मंत्रिपदे देण्यात येतील. त्यात कॅबिनेट, राज्यमंत्रिपदे आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २२ दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे विस्तार झाला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App