Bullet Train : दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बुलेट ट्रेनची मुंबई – नांदेड “देवाण-घेवाण”!!


विशेष प्रतिनिधी

नांदेड : महाराष्ट्रात मेट्रोची दणक्यात सुरुवात होत असताना बुलेट ट्रेनचे मात्र प्रकल्प रखडले आहेत. याच मुद्द्यावरून दोन माजी मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनची आपापसात “देवाण-घेवाण” केली…!Bullet train between two former CMs Mumbai-Nanded exchange

निमित्त होते नांदेड मधल्या कार्यक्रमाचे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नेते माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने एकत्र आले होते.

या कार्यक्रमात बोलताना दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनचा विषय काढला. बुलेट ट्रेन विदर्भातून जात आहे. ती नांदेड मार्फत मराठवाड्यामध्ये वळवा यासाठी तुम्ही केंद्राकडे प्रयत्न करा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केली. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला नक्की मदत करतो पण तुम्ही देखील सध्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्राच्या हद्दीत थांबलेले काम सुरू करायला सांगा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक सुभाष चव्हाण यांना केली.

दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे मुंबई – अहमदाबाद आणि मुंबई – हैदराबाद अशा स्वरूपाच्या बुलेट ट्रेनची एकमेकांमध्ये देवाण-घेवाण केली.

मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू होण्याची संकल्पना महाराष्ट्र सरकारने मांडली आहे. तिचा प्रस्तावित मार्ग विदर्भातून जातो आहे. पण ती नांदेड मार्गे वळवा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. त्याच वेळी महाराष्ट्राच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम थांबले आहे ते लवकर सुरू करायला सांगा अशी सूचना करायला देखील देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत.

– मुख्यमंत्र्यांकडून अडवणूक

मुंबई-अहमदाबाद मत महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनला जपानची मदत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या प्रकल्पात लक्ष घातले आहे, पण त्यामुळेच राजकीयदृष्ट्या विरोध म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचा प्रकल्प अडवून धरला असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेचे अनेक नेते मुंबईतून अहमदाबादला बुलेट ट्रेनने जायचे कोणाला? अहमदाबाद मधूनच या बुलेट ट्रेन मधून लोक मुंबईत येणार आहेत, असे वारंवार शरसंधान साधत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना सध्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना करण्याचे आवाहन केले आहे.

Bullet train between two former CMs Mumbai-Nanded exchange

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती