विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना वाढतआहे. त्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. अशात गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ (Work Form Home) करता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.
मुंबईसह राज्यातील पोलिसांना देखील कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते वर्क फ्रॉम होम करु शकतात. याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App