पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्याची विद्यार्थ्यांना धमकी; उकळली 10 लाखांची खंडणी!!; सराईत गुंडाला अटक


प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्याने विद्यार्थ्यांकडून 10 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला संपवून टाकण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी उळलीच. वर आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली.Boiled 10 lakh ransom Sarait gangster arrested

याप्रकरणी मूळचा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी मधील अमर सूर्यकांत पोळ याला पोलीसांनी अटक केली आहे. तो सराईत गुंड आहे. तर याच विद्यार्थी खंडणी प्रकरणात त्याचा पुण्यात हडपसरच्या अमरकुंज सोसायटी राहणारा साथीदार करण मधुकर कोकणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे.
याप्रकरणी 23 वर्षाच्या एका विद्यार्थ्याने चतुशृंगी पोलीस ठाणे तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी विद्यार्थी हा पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्याची एका मित्राद्वारे अमर पोळशी ओळख झाली होती. त्याने डिसेंबर २०१९ मध्ये नवीन सोशल मीडियाचे व्यवसायासाठी ऑफिस सुरू करण्यासाठी फिर्यादीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने पैसे दिले नाहीत.

तेव्हा पोळ याने तू आम्हाला पैसे का देत नाही?, तुला आम्ही पैसे का मागतो ते समजत नाही का?, तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही का?, तुला आम्हाला पैसे द्यायचे नाहीत का, तुला पुण्यात शिक्षणासाठी राहू देणार नाही. तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. फिर्यादीकडून 5 लाख रुपये बैंक ट्रान्सफरद्वारे घेतले. तसेच करण कोकणे याने आणखी एका तरूणाकडून २ ते ३ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.

काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन पैसे न दिल्याने त्यांनी पैसे परत मागितल्यावर उलट त्यांच्याकडे आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर पोळ याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करीत आहेत.

Boiled 10 lakh ransom Sarait gangster arrested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात