विशेष प्रतिनिधी
मुंबई : महापालिका कारभारात शिवसेनेने केलेले घोटाळे, निधीचे गैरव्यवहार, निधीचे मनमानी वाटप, विकास कामांबाबत केलेला भेदभाव आदी मुद्यांवर मुंबई महापालिकेतील कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी मुंबई भाजपच्या वतीने आता पोलखोल अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने शिवसेनेला टार्गेट करण्यात येणार आहे. भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.BJPs Polkhol campaign in Mumbai
त्यासाठी लहानलहान सभांचे आयोजन प्रत्येक वॉर्डात केले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर विधानसभेत हल्लाबोल करताना जे मुद्दे मांडले ते एकत्रित करून त्याची एक पुस्तिका तयार केली जाणार असून तिचे वाटपही करण्यात येणार आहे.
भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते १५ ते ३० एप्रिलदरम्यान पक्षाचा राज्यभर दौरा करतील, असा निर्णय घेण्यात आला. संघटनात्मक मजबुतीसाठी हे दौरे असतील. त्यासाठी देवेंद्र फडणवीस – सोलापूर, ग्रामीण, रावसाहेब दानवे – बुलडाणा नंदूरबार, अहमदनगर, चंद्रकांत पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक, सुधीर मुंनगंटीवार – बीड, जालना,
पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली, आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी, चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती, प्रवीण दरेकर – पालघर, मीरा भाईंदर, गिरीश महाजन – उस्मानाबाद, हिंगोली, डॉ. संजय कुटे – दक्षिण रायगड, उत्तर रायगड, रवींद्र चव्हाण – सातारा, पुणे संभाजी पाटील निलंगेकर – गोंदिया, भंडारा असे जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App