वृत्तसंस्था
कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार हे सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिला. BJP to hold Rally after Sharad Pawars Rally : Chandrakant Patil’s aggressive stance on OBC reservation point
‘खोटं बोल पण रेटून बोलं’ याप्रमाणे शरद पवार केंद्राकडे बोट दाखवत बचाव करत आहेत. मात्र १६ वर्षे सोडली तर अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात देखील यांची सत्ता होती. मग त्यावेळी घटनादुरुस्ती का करून घेतली नाही? असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण टिकवले होते ते आरक्षण यांना टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे शरद पवार अशी विधाने करत आहेत, असे पाटील यांनी म्हटलं आहे. याआधी मी २८ वेळा याबाबत बोललो आहे, मात्र पुन्हा शरद पवार खोटे बोलले आहेत त्यामुळे मला माध्यमांच्यासमोर यावं लागलं आहे असेही पाटील म्हणाले.
शरद पवार यांचं वय झालं नाही का?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांचं वय झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही,अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? त्यामुळे कुणी कुणाचं वय काढू नये, १२ आमदारांच्या विषयावर कोर्टाने देखील सांगितलं आहे की तो राज्यपालांचा अधिकार आहे.
नारायण राणे त्यांच्या यात्रेने शिवसेनेला शह
केंद्रातील नवनियुक्त मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जिल्ह्यांमध्ये दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. नारायण राणे हे मुंबईतून जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेला शह हा त्या जन आशीर्वाद यात्रेतील बाय प्रॉडक्ट असेल असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App