यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत. तर चौघांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.BJP to form government in Rajasthan; Ramdas Athavale expressed confidence
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल शनिवारी राजस्थानमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.मुख्यमंत्री अशोक गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.आज रविवारी (ता.२१) दुपारी चार वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत. तर चौघांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजस्थानमधील मंत्रिमंडळ फेरबदलावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पुढे आठवले यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की , काँग्रेस पक्षाचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण फक्त दिखाव्याचे आहे.
काँग्रेस दलितांना त्यांचे हक्क मिळून देण्यास अयशस्वी ठरले.याच कारणामुळे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले.पुढे आठवले म्हणाले की या फेरबदलाने फरक पडणार नाही. कारण राजस्थानात भाजपची सरकार बनेल,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App