‘’ शरद पवारांना एखाद्यावेळेस कळलही असेल, ज्यांच्या परिवारातील ५० लोक निघून जातात, ते पुढे…’’ बावनकुळेंचं विधान!

Bawankule and Uddhav Thakray

‘’संजय राऊत महाविकास आघाडीचंही वाटोळं करणार आहेत.’’, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरोडी येथे पत्रकारपरिषदेत बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आधारित प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडून भाजपा आणि राज्य सरकारवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. याशिवाय, महाविकास आघाडीत सध्या सारंकाही आलबेल नसल्याचं पुढे येत आहे, यावरही बावनकुळेंनी टिप्पणी केली. तसेच, आज शरद पवारांनी २०२४मधील निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, याबाबत दिलेल्या उत्तरावरही बावनकुळेंनी प्रतिक्रिय दिली आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray Sanjay Raut and Mahavikas Aghadi

पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं की, ‘’शरद पवार काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. परंतु उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागत आहेत, कधी महाविकास आघाडीची सभा वेगळी घेतात. कधी आपली सभा वेगळी लावतात, म्हणजे स्वत:च उद्धव ठाकरे… एकदा ठरलं महाविकस आघाडीचं, त्याचं जसं मला दुरूनदुरून दिसतं, की आपण संयुक्तपणे सभा घ्यायची. मग आता वेगवेगळ्या सभाही ते घेत आहेत.


VIDEO : ‘’आमच्या राजकारणातही सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळाचा प्रयत्न करतात, पण…’’


त्यांच्यात आपसात काय सुरू आहे याबाबत मला बोलायचं नाही. पण शरद पवारांनाही आज ना उद्या कळेलच, की ज्यांच्या परिवारातील ५० लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्व पुढे करू शकतात का? हे शरद पवारांना एखाद्यावेळेस कळलही असेल.’’

याचबरोबर ‘’उद्धव ठाकरेंच्या लोकांना ज्या सवयी लागल्या आहेत, त्या सवयीनुसार ते बोलत आहेत. आमच्या जीवनात, रक्तात कधीही बेईमानी नाही. बेईमानी त्यांच्या रक्तात आहे. आम्ही कधीही कुणाला धोका देत नाही. आम्ही कधीही कुणाला धोका देण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपा कधीही कोणाला धोका देत नाही. ज्याचं ज्याचं जसंजसं नेतृत्व आहे, त्यांना तशी संधी मिळते. त्यांनी धोका दिला आहे, पाठीत खंजीर खूपसण्याचं त्यांचं रक्त आहे, आमचं नाही.’’ असंही बावनकुळेंनी यावेळी म्हटलं.

याशिवाय ‘’एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि दोघेही उत्तम काम करत आहेत. महाविकास आघाडीकडूनच वावड्या उठवल्या जात आहेत. अजित पवारांना तेच बदनाम करत आहेत. शरद पवारांना हे बोलावं लागत आहे की आमची महाविकास आघाडी टिकेल की नाही टिकेल. हे कशामुळे? कारण, महाविकास आघाडीमध्येच मोठ्याप्रमाणावर धुसफूस सुरू आहे. त्यावर शरद पवारही कंटाळले असतील असं मला वाटतं. कारण, काहीच तारतम्य नाही. सकाळी रोज उठून कोणीतरी बोलतं आणि दिवसभर त्याची उत्तर द्यावे लागतात. खरंतर संजय राऊतांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे. पहिले भाजपा-शिवसेना युतीचं वाटोळं केलं,  ते आता महाविकास आघाडीचंही वाटोळं करतील. त्यांच्यामुळे ५०-६० लोक निघून गेले. आता महाविकास आघाडीचंही आज ना उद्या वाटोळं होईल.’’

BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray Sanjay Raut and Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात