विशेष प्रतिनिधी
पुणे : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकारण वेगळे आणि त्यातील स्नेहभाव वेगळा. याची झलक आज पहायला मिळाली. पुण्यातील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसने उभारलेल्या नूतन कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते.BJP delegation at NCP camp
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पुणे पालिकेमध्ये कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. एरवी एकमेकांवर टीका,टिप्पणी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात भेटले.
या वेळी भाजपचे खासदार गिरीश बापट , शहराध्यक्ष जगदीश मुळीक,योगेश टिळेकर,सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App