दोनशे जागा मिळवणे शक्य; नाशिकच्या कार्यकारिणीत फडणवीसांचा आशावाद

विशेष प्रतिनिधी

नाशिक  : नाशिक येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. व्यासपीठावर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे: BJP can win 200 seats in Maharashtra: Fadanvis

  •  शूर्पणखेचे नाक जेथे कापले गेले, ती हीच नाशिक नागरी आहे. अहंकाराचे नाक कापणारे हे शहर आहे.शत प्रतिशत भाजपाचा नारा याच शहरात दिला गेला, पण त्यावेळी ते लोकांना स्वप्न वाटले. आज स्थिती आपल्यापुढे आहे.
  • पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी आपल्याला अंत्योदयाचा विचार दिला. आजचा दिवस समर्पण दिवस सुद्धा आहे. समर्पणासोबत त्यागाचीही भावना असते.
    चुकीच्या विचारांचा त्याग, अनियंत्रित महत्वाकांक्षेचा त्याग आणिअहाकरांचा त्याग हा अपेक्षित आहे. हे गद्दारांचे सरकार नाही, हे खुद्दारांचे सरकार आहे.
  • कायदा आणि संविधान आम्हालाही कळतो. हे रोज सकाळी खोटे का बोलतात, कारण त्यांना उरलेले त्यांना टिकवायचे आहेत.
  •  हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करेलच. आणि पुढच्या निवडणुकीत पुन्हा दीडपट अधिक जागा घेऊन निवडून येणार.
    महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराची टी-ट्वेंटी खेळली, आपली सेवेची टी-ट्वेंटी आहे.
  •  राज्यात सेवा करणारे सरकार आल्याबरोबर 10,000 कोटींची मदत आपण शेतकऱ्यांना दिली, त्यांच्या काळात जाहीर केलेली मदत सुद्धा दिली.
    15 सिंचन प्रकल्पांना 24 हजार कोटी रुपयांची मान्यता दिली.
  •  समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात नेणे, नळगंगा-पैनगंगा प्रकल्प करण्याची संधी त्यांना होती. पण अडीच वर्ष कोणत्याच फाईलवरची धूळ त्यांनी झटकली नाही. आता 6 महिन्यात सर्व प्रकल्प ‘ऑन ट्रॅक’ आहेत.
  •  समृद्धी महामार्ग राज्याच्या तिजोरीवर भार न टाकता आम्ही तयार करून दाखविला. पैसे नाहीत, म्हणून बोंबा मारणारे आम्ही नाही. त्यामुळे हाती घेण्यात येणारी प्रत्येक योजना, प्रकल्प पूर्ण करून दाखवू.
  • पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. हा मार्ग एक नवा आर्थिक कॉरिडॉर असेल. नाशिकमध्ये नियो मेट्रो सुद्धा होणार आहे. लवकरच हा निर्णय सुद्धा झालेला दिसेल.

  • सौर फिडरची योजना राज्य सरकार साकार करते आहे. त्यामुळे बारा महिने 24 तास वीज देता येणे शक्य होणार आहे.
    जेथे जमीन उपलब्ध होणार नाही, तेथे वार्षिक 70 हजार भाडे देण्यात येणार आहे. 2 लाख सौरपंपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
  •  आपण भाग्यशाली आहोत, नरेंद्र मोदीजी यांच्यासारखे वैश्विक नेतृत्व आपल्याला लाभले. जी-20 हा अतिशय महत्वाचा मंच आहे.
  •  परिवर्तन कशाला म्हणतात? भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारात वाढ होऊन ती 10 वरुन 5 व्या क्रमांकावर आली.
    ईपीएफओ सदस्य संख्या आता 27 कोटी झाली, ही संख्या निर्माण झालेली रोजगार संख्या दर्शविते.
  •  भारतात युपीआय पेमेंट 126 लाख कोटी इतके आहेत. स्वच्छ भारत अभियानात 11.7 कोटी घरांमध्ये शौचालय दिले, उज्वला योजनेत 9.6 कोटी एलपीजी जोडण्या दिल्या. प्रधानमंत्री जनधन खाते 47.8 कोटी इतके उघडले गेले.
  •  पीएम सुरक्षा विमा योजना/पीएम जीवनज्योती योजनेत 44.6 कोटी नागरिकांना विमा सुरक्षा मिळाली. पीएम सन्मान निधीअंतर्गत 11.4 कोटी शेतकर्‍यांना 2.2 लाख कोटी रु. रोख हस्तांतरण झाले.
  • लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आता वंदे भारत रेल्वे तयार होणार आहेत. महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकाचा कायाकल्प होणार आहे. महाराष्ट्राला रेल्वेचा मोठा निधी यावर्षी मिळाला आहे.
  •  विकास हा आमचा स्थायीभाव आहे, राष्ट्रवाद हा आमचा स्थायीविचार आहे, पण गरीब कल्याण आणि सर्व समाजांचा विकास हेच आपले मूलभूत ध्येय आहे.
  •  200 जागा देखील आम्ही निवडून आणू.
  • 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आणि पत्रकारांना सुद्धा आपल्याला जिंकताना पाहण्याची सवय लागली आहे. पण एक सुद्धा पराभव झाला तर, हा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. अमरावतीमध्ये 3000 मतांनी पराभूत झालो, पण 6000 आपली असलेली मते बाद झाली, यावर चिंतन करावेच लागेल.

https://youtu.be/GgT1guZTqGk

BJP can win 200 seats in Maharashtra: Fadanvis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात