Govt Slashes Prices of Pulse Oximeter and 4 Other Medical Devices : केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय औषध दरनिश्चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) जनहिताच्या दृष्टीने आपल्या असाधारण अधिकारांचा वापर करत 13 जुलै 2021 रोजी एका अधिसूचनेद्वारे पाच वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारी फायद्यांचे प्रमाण निर्धारित केले आहे. Big Relief by Central Govt Slashes Prices of Pulse Oximeter and 4 Other Medical Devices Check Details
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय औषध दरनिश्चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) जनहिताच्या दृष्टीने आपल्या असाधारण अधिकारांचा वापर करत 13 जुलै 2021 रोजी एका अधिसूचनेद्वारे पाच वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारी फायद्यांचे प्रमाण निर्धारित केले आहे.
वितरकाच्या पातळीवर दरांवरील लाभाची मर्यादा 70% करण्यात आली. या वैद्यकीय उपकरणांची एकूण 684 उत्पादने/ब्रँडस आणि 620 उत्पादने/ब्रँड्स यांच्या दरात 23 जुलै 2021 रोजी कपातीची नोंद झाली.
पल्स ऑक्सिमीटर या उत्पादनाच्या दरात सर्वाधिक घट नोंदवली गेली. ती प्रति युनिट 2,95,375 पर्यंत होती. या दर कपातीचे तपशील खालील प्रमाणे आहेत.
आयात केलेल्या आणि स्थानिक ब्रँडसच्या किंमतीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आणि नेब्युलायझरच्या दरात सर्वोच्च कपात झाल्याची माहिती आयातदारांनी दिली आहे.
या सर्व उत्पादनांची 20 जुलै 2021 पासून लागू असलेली सुधारित कमाल किरकोळ किंमत या विषयीची माहिती राज्य औषध नियंत्रकांकडे अतिशय काटेकोर देखरेखीसाठी आणि अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे. या संदर्भातील निर्देश एनपीपीएच्या वेबसाईटवर (www.nppa.gov.in) उपलब्ध आहेत. उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक/ आयातदार यांना त्यांच्याकडील साठ्याचे त्रैमासिक तपशील कळवण्याचे निर्देश दिले आहेत. या महत्त्वाच्या निर्णयाला फिक्की, एडव्हामेड आणि ऐमचॅम यांसारख्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
Big Relief by Central Govt Slashes Prices of Pulse Oximeter and 4 Other Medical Devices Check Details
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App