मोठी बातमी : मुंबई बँक शिवसेना-राष्ट्रवादीच्या ताब्यात, प्रवीण दरेकरांना धक्का देत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, प्रसाद लाड यांचा पराभव

 

भाजप नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत मोठा फेरबदल घडवून आणला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला आहे. यामुळेच दरेकरांसाठी पर्यायाने भाजपला हा मोठा धक्का आहे.Big News Mumbai Bank in the possession of Shiv Sena-NCP, Defeat of Prasad Lad, Praveen Darekar lost presidency


वृत्तसंस्था

मुंबई : भाजप नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत मोठा फेरबदल घडवून आणला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला आहे. यामुळेच दरेकरांसाठी पर्यायाने भाजपला हा मोठा धक्का आहे.

मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हजर होते. ही बैठकच गेमचेंजर ठरली. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या आघाडीची बेरीज पक्की ठरली आणि भाजपला धक्का बसला.या बैठकीनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत मुंबई बँकेमधये भाजपला धक्का देत परिवर्तन घडवून आणलं. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली.

प्रवीण दरेकर यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीला बोलताना ते म्हणाले की, “आम्ही तेथे एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यावेळी पक्षाचा अभिनिवेश नव्हता. पक्षाची पादत्राणे बाजूला ठेवून ही निवडणूक लढली गेली. मी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे जे निवडणुकीत ठरलं होतं की राजकारण विरहित सगळ्यांनी एकत्र काम करायचं, त्याला तडा दिला गेलाय. एकत्रितपणे आम्ही बँक चालवत होतो. सहकारात हे होत राहतं. बँकेच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करत राहू. सगळ्या विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन करतो,” असंही ते म्हणाले.

मुंबई बँकेवरील भाजप संचालकांमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, विठ्ठल भोसले, आनंद गाड, कविता देशमुख, विनोद बोरसे, सरोद पटेल, नितीन बनकर, अनिल गजरे यांचा समाावेश आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांमध्ये संदीप घनदाट, शिवाजीराव नलावडे, पुरुषोत्तम दळवी, विष्णू गंमरे, सिद्धार्थ कांबळे, जयश्री पांचाळ, नंदू काटकर, जिजाबा पखर यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या संचालकांमध्ये सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार यांची नावे आहेत.

अशा पद्धतीने मुंबई बँकेच्या संचालकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 11 संचालक होत आहेत. तर भाजपचे 9 संचालक आहेत.

Big News Mumbai Bank in the possession of Shiv Sena-NCP, Defeat of Prasad Lad, Praveen Darekar lost presidency

महत्त्वाच्या बातम्या