राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आता राज्यातील सुपरमार्केट मध्ये मिळणार वाईन


राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे.Big decision of state government; Wine will now be available in state supermarkets


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.आतापासून राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे.आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.तसेच आता पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.



त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. महत्वाची बाब म्हणजे सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.

Big decision of state government; Wine will now be available in state supermarkets

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात