डॉ.आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी भीमज्योत मशाल यात्रा पुणे ते महू दरम्यान १५ फेब्रुवारी पासून आयोजन

विशेष प्रतिनिधी

पुणे : महू (मध्य प्रदेश ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवली. संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू दरम्यान भीमज्योत मशाल यात्रा काढण्यात येत आहे. Bhimjyot to save Dr. Ambedkar Janmabhoomi monument ‘torch travel’ Organized between Pune to Mhow from 15th February

संयुक्त संविधान बचावो कृती समिती,भीम जन्मभुमी बचावो कृती समिती,इनक्रेडिबल समाजसेवक गृपच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली .



यावेळी असलम इसाक बागवान,विलास किरोते,डॉ आंबेडकर स्मारक समितीचे माजी सचिव मोहन वाकोडे (महू), अॅड. राहुल जैन, राजू पंजाबी, संदेश दिवेकर , सचिन आल्हाट, निखिल जाधव उपस्थित होते.

असलम इसाक बागवान​ या यात्रेचे नेतृत्व करणार असून १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन ) येथून यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे.औरंगाबाद,जळगाव,भुसावळ मार्गे महूला ही यात्रा १९ फेब्रुवारी रोजी पोहचेल. २० फेब्रुवारी पासून अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरूवात होईल, मागणी मान्य होई पर्यन्त सुरु राहील.

मध्य प्रदेश सरकारने महू येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे व्यवस्थापन करणारी डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटी १९७२ साली स्थापित केली. मूळ संस्था बाजूला करुन नवी स्मारक समिती स्थापन करून त्यात संघ विचाराचे सदस्य घुसविण्यात आले आहेत. असंवैधानिक पद्धतीने ही समिती तयार केली. डॉ आंबेडकर जन्मभूमीवर कब्जा मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. याविरोधात भारतभर आंदोलन करण्यात येणार असून ही यात्रा त्याचाच एक भाग आहे. नव्याने स्थापन केलेली समिती रद्द करावी ,अशीही मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून कायद्याची परिभाषा तयार केली त्यांच्याच स्मारकाचे संचालन करणारी समिती असंवैधानिक पद्धतीने ताब्यात घेतली जात आहे , हे संतापजनक आहे.विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांना याबाबत कल्पना देऊन स्मारक समिती वाचविण्याचे आंदोलन मोठे करण्यात येणार आहे,असे मोहन वाकोडे यांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात