पहाटेचा शपथविधी ते लवासाचा मुद्दा; देहरादून मधून भगतसिंह कोशियारींचा शरद पवारांवर निशाणा

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात विविध वादग्रस्त मुद्दे तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशियारी राजीनामा देऊन आपले राज्य उत्तराखंडला निघून गेल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विविध घडामोडी बाबत त्यांच्या पद्धतीने मोकळेपणाने बोलले आहेत. मुंबई तकचे प्रतिनिधी साहिल जोशींना दिलेल्या मुलाखतीत कोशियारी यांनी अनेक धक्कादायक खुलासा केले आहेत.  Bhagat Singh koshiyari targets sharad Pawar over his remarks on Removal of president’s rule in maharashtra during koshiyari’s tenure

त्याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी ते लवासाचा मुद्दा यावरून शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात असताना राज्यपाल पदाच्या मर्यादेमुळे ज्या गोष्टी उघडपणे सांगता आल्या नव्हत्या, त्यातल्या काही गोष्टी कोशियारी यांनी या मुलाखतीत उघडपणे सांगितल्या आहेत. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचे पाच पानी पत्र त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. त्यात सगळी धमकीची भाषा होती आणि शेवटी 15 दिवसांत 12 आमदार नेमा असे लिहिले होते. राज्यपाला सारख्या घटनात्मक प्रमुखाला अशा धमकीच्या भाषेत कोणी पत्र लिहिले असते का?? शरद पवार एवढे वर्ष राजकारणात आहेत, त्यांनी तरी असे पत्र लिहिले होते का??, असा परखड सवाल करून कोशियारी यांनी 12 आमदारांच्या नियुक्ती पत्रावर आपण स्वाक्षरी करायला का नकार दिला?, त्याचे नेमके कारण सांगितले.

पहाटेच्या शपथविधीची घटना शरद पवारांना माहिती होती असा गौप्य स्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्या गवप्यस्फोटालाच भगतसिंग कोशियारी यांनी वेगळ्या पद्धतीने दुजोरा दिला आहे. शपथविधी बाबत पवार आपल्याला माहिती नाही, असे म्हणत असतील तर ते स्वतःचे राजकारण साधून घेण्यासाठी तसे बोलत आहेत. त्यांनी सध्या हायकोर्टात सुरू असलेल्या लवासा प्रकरणावर दहा वेळा विचार करून बोलावे, असा टोला कोशियारी यांनी हाणला आहे.



-‘या मुलाखतीत कोशियारी यांच्यासमवेत झालेली प्रश्नोत्तरे अशी

प्रश्न : तुमच्या काळात लोकांसाठी राजभवन खुले झाले हे खरे पण, राजभवन इतकं कधीच वादात राहिले नाही. अजित पवारांचा शपथविधी झाला. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली गेली, ते कसे झाले?

भगतसिंह कोश्यारी : राजकारणात जेव्हा मी राहणार नाही. अनेक लोक राहणार नाहीत. आणि जे खरे राजकारणी आहेत. अभ्यासक आणि विचारवंत आहेत, ते विचार करतील की एका रात्रीत हे कसे झाले? कधी कधी तर अशा गोष्टी एका क्षणात होतात. तुम्ही तर एका रात्रीचे बोलत आहात. भूकंप आल्यानंतर एका क्षणात घडून जाते. आणि तुम्हाला कुणी सांगितले की ते एका रात्रीत झाले? स्वाभाविक आहे की, माझ्याकडे एक मोठ्या पक्षाचा नेता येतो आणि त्याच्यासोबत मित्रपक्षाचा नेता येतो. ते म्हणतात की, माझ्याकडे पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे नेते विश्वसनीय आहेत. छोटे पण नाहीत. अजित पवार छोटे नेते नाहीत. ते मला येऊन भेटले. त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. मी म्हणालो ठिक आहे. तुमचे बहुमत आहे. सिद्ध करा. मी सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. असे झाले असेल की वेळ जास्त दिला. पण कोर्टाने सांगितले वेळ कमी करा. कमी केला. बहुमत सिद्ध करण्यास समर्थ नव्हते मग त्यांनी राजीनामा दिला. ही सामान्य गोष्ट आहे.

प्रश्न : पण त्या दोघांनी लपून छपून शपथ घेतली. कुणालाही ते माहिती नव्हते. सर्वसामान्यपणे माध्यमांना बोलावले जाते. आमंत्रित केलं जातं.

भगतसिंह कोशियारी : राज्यपाल कुणाला शपथविधीसाठी बोलवत नाही. हे काम राज्यपाल करत नाहीत. हे काम सरकार करते आणि ज्याला शपथ घ्यायची असते, तो करतो. जे काही झाले, त्या सगळ्यामध्ये मला असे वाटतं की, मी ज्यांना शपथ दिली, देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी यासंबंधी त्यांची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. मला वाटत त्यांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर यात राज्यपाल म्हणून मी मध्ये येतोच कुठे??

प्रश्न – पण यात आता असे म्हटले गेले की शरद पवारांना याची माहिती होती की नाही. असेही म्हटले गेले की हा शपथविधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट हटली नसती.

भगतसिंह कोशियारी : जर शरद पवारांसारखे एवढे मोठे नेते जर आणि तरच्या भाषेत बोलत असतील, तर मी म्हणेन की, ते त्यांचे राजकारण साधून घेण्यासाठी तसे बोलत आहेत. मग त्यांनी हायकोर्टात जे लवासाचं प्रकरण आहे. त्यावर दहा वेळा विचार करायला हवा. हायकोर्टाने लवासा प्रकरणात त्यांच्याबद्दल काय म्हटले आहे याचा त्यांनी विचार करावा. ते मोठे नेते आहेत. त्यांचा मी सन्मान करतो. माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट दिली गेली. मी त्यांचा आदर करतो. तेच जर असे बोलत असतील, तर ते त्यांचे राजकारण साधण्यासाठी बोलत आहेत.

प्रश्न : देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देण्यासाठी दबाब होता का?

भगतसिंह कोशियारी : माझ्यावर कोणताही दबाब नव्हता. पण, नेता जेव्हा वेळ मागतो की, बहुमत सिद्ध करायचे आहे. तर मी वेळ दिला. त्यानंतर लोक कोर्टात गेले. कोर्टाने सांगितले लवकर बहुमत चाचणी घ्या. मी सांगितले लवकर घ्या. यात मी कुठे मध्ये येतो?? सकाळी 8.00 वाजता शपथविधी झाला. तरीही असे पसरवले गेले की, रात्री शपथविधी झाला.

Bhagat Singh koshiyari targets sharad Pawar over his remarks on Removal of president’s rule in maharashtra during koshiyari’s tenure

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात