राज्यात वर मैत्री; खाली मात्र राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी!!; शिवसंपर्क अभियानातून खासदारांच्या तक्रारींचा पाऊस


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची राज्यात वरच्या स्तरावर मैत्री आहे, पण खाली जिल्हा स्तरांवर मात्र राष्ट्रवादी शिवसेनेवर ठिकाणी कुरघोडी करताना दिसते आहे. अशा तक्रारी दुसऱ्या-तिसऱ्या कोणाच्या नसून प्रत्यक्ष शिवसेना खासदारांच्या आहेत. या तक्रार शिवसंपर्क अभियानातून पुढे आल्या आहेत. Below, however, the NCP’s puppet on Shiv Sena !!; Rain of MPs’ complaints from Shiv Sampark Abhiyan

– कीर्तीकर, जाधव, शिंदे यांच्या तक्रारी

खासदार गजानन कीर्तिकर, संजय जाधव डॉ. श्रीकांत शिंदे या तीन खासदारांनी गेल्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी विरोधातील तक्रारींचा पाढा जिल्हास्तरावरून ऐकला आहे आणि तो शिवसेना पक्षप्रमुख यांच्या कानावर घालण्यासाठी जाहीर पत्रकार परिषदांमध्ये सांगितला आहे.

– संजय जाधवांचे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

पुण्याच्या शिवसंपर्क अभियानात संजय परभणी चे खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष शरसंधान साधले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते भरभरून निधी देतात आणि जे राज्यस्तरावर सूत्र ठरले त्या सूत्राप्रमाणे 20 % निधी सुद्धा शिवसैनिकांना देत नाहीत, असा आरोप संजय जाधव यांनी केला. आधी भाजपने आमची ठोकली. आता राष्ट्रवादी ठोकते आहे, अशा शब्दांमध्ये संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेही वाभाडे काढले.

– कीर्तीकरांचा रोहित पवारांवर बाण

गजानन कीर्तिकर या सर्वात वरिष्ठ खासदारांना अहमदनगरच्या शिव संपर्क अभियान याची जबाबदारी आहे त्यांनी कालच थेट आमदार रोहित पवार यांना उद्देशून जोरदार शरसंधान साधले. शिवसैनिकांना त्रास देण्याचे धंदे रोहित पवारांनी बंद करावेत अन्यथा महाविकास आघाडीला शिवसैनिक देखील बांधील नाहीत असा इशारा त्यांनी थेट पवारांच्या राजकीय घराण्याला देऊन टाकला.

– डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

ठाण्याचे खासदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील सातारा जिल्ह्यात हाच सूर लावला आहे. सातारा जिल्ह्यात निधी वाटपात शिवसैनिकांवर अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही. जिथे राष्ट्रवादी प्रबळ आहे तिथे शिवसैनिकांना चेपतात. पण शिवसैनिक उसळल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला आहे.

– राऊतांची कोल्हापूर मोहीम

शिवसंपर्क अभियानातून या तक्रारी बाहेर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. पण गजानन कीर्तिकर, संजय जाधव, डॉ. श्रीकांत शिंदे त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या तक्रारी आल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत कोल्हापुरात संपर्क अभियानात आहेत. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीतला आपणच पूल आहोत हे दाखवून दिले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी वरून झालेला गदारोळ मिटवण्यासाठी संजय राऊत न्यू पॅलेस मध्ये जाऊन शाहू महाराजांना भेटले.

परंतु एकीकडे ठाकरे, पवार आणि राऊत यांची वरिष्ठ पातळीवर मैत्री असताना जिल्हा जिल्ह्यांमधून मात्र शिवसैनिकांच्या राष्ट्रवादी विरोधातल्या शिवसैनिकांच्या प्रचंड तक्रारी येत आहेत आणि त्यावर पक्षप्रमुखांनी परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी होताना दिसत आहे.

Below, however, the NCP’s puppet on Shiv Sena !!; Rain of MPs’ complaints from Shiv Sampark Abhiyan

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात