“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; राजकारण करायला गल्लीत यावे लागते…” भाजपाने साधला निशाणा!


वृत्तसंस्था

मुंबई : “ नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
“Being a nationalist in name does not make a party national; You have to come to the streets to do politics “BJP attack on NCP

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश व गोवा येथील निवडणुकांवरून महाराष्ट्रातील राजकारण गरम झालं आहे. कारण, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील या राज्यांमधील निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपानेही कंबर कसली आहे. दोन्ही बाजूचे नेते आरोप-प्रत्यारोप करतआहेत. गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहेत. या वरून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही” तसेच, “निश्चतच, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल.” असं देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

गोव्यात शरद पवार भाजपाला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, “हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.”

Being a nationalist in name does not make a party national; You have to come to the streets to do politics “BJP attack on NCP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात