राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. परंतु, यावेळचा एक किस्सा आता सांगितला जात आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि हा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. थत्ते यांनी यावेळचा प्रसंग आपल्या यूट्यूब चॅनलवर रंगवून सांगितला आहे. Before going for surgery, CM Uddhav Thackeray had called PM Modi, Anil Thatte made this claim
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. परंतु, यावेळचा एक किस्सा आता सांगितला जात आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि हा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. थत्ते यांनी यावेळचा प्रसंग आपल्या यूट्यूब चॅनलवर रंगवून सांगितला आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये अनिल थत्ते म्हणतात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा शस्त्रक्रियेसाठी जात होते तेव्हा काहीसे विचारात पडलेले होते. त्यांनी काही क्षण विचार करून कुटुंबीयांसमोर पंतप्रधान मोदींना बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सर्व जमवाजमव करायला काही मिनिटे लागली. काही मिनिटांतच खुद्द पंतप्रधान मोदी फोनवर आले. हा व्हिडिओ कॉल होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ऑपरेशनला जात असल्याचे सांगितले.
थत्ते यांनी यांनी दावा केलाय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींवर श्रद्धा आहे. ते त्यांना स्वर्गीय बाळासाहेबांसमान मानतात. ते मोदींना म्हणाले की, मी आता ऑपरेशनला जात आहे. ही अवघड शस्त्रक्रिया आहे. जर काही अनर्थ झाला तर माझ्या कुटुंबाची काळजी घ्या. यावर पंतप्रधान मोदींनीही काहीही काळजी करू नका. सर्व काही सुखरूप पार पडेल, असे आश्वस्त केले. तर हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या गगनभेदी यूट्यूब चॅनलवर नुकताच शेअर केला आहे. थत्ते यांनी ही माहिती दोन्ही बाजूंनी कन्फर्म केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच अवघड शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर त्यांना अनेक दिवस विश्रांती घ्यावी लागली. पण तरीही त्यांनी राज्य कारभारातही वेळोवेळी सहभाग नोंदवला. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी आता राज्य कारभार इतरांवर सोपवावा, असा सल्लाही त्यांना दिला होता.
https://youtu.be/-h6rYxXikD0
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App