प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे यांच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर महाराष्ट्र सैनिक आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वेगवेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत. Be careful when presenting the role of MNS; Party’s support to Maharashtra soldiers
या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक पत्रक प्रसिद्ध करून मनसैनिकांना तंबी दिली आहे. मनसे पक्षाबाबत वरिष्ठ नेते अधिकृत भूमिका मांडत असतात. पण आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून वरून कोणत्याही नेत्याने भूमिका मांडताना भाषेचे भान बाळगावे. कोणत्याही स्थितीत पक्षाच्या विपरीत भूमिका मांडता कामा नये अन्यथा पक्ष शिस्ती विषयी संबंधितांची दखल घेतली जाईल, असा इशारा मनसे अधिकृत ट्विटर हँडल भरून मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी…#MNSAdhikrut pic.twitter.com/iQGqrsLSVK — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2022
महाराष्ट्र सैनिकांसाठी…#MNSAdhikrut pic.twitter.com/iQGqrsLSVK
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2022
राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्या विरोधात भूमिका मांडल्यानंतर पुण्यातले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी वेगळा सूर लावला होता. आज देखील त्यांनी मुस्लिमांच्या हस्ते हनुमंताची महाआरती केली. त्याचबरोबर काही ठिकाणी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या विपरीत सूर लावल्याचे मनसेच्या नेत्यांना आढळले या पार्श्वभूमीवर मनसे अधिकृत ट्विटर हँडलवर नितीन सरदेसाई यांनी संबंधितांना पक्ष शिस्त पाळण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App