विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईचा पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी केली. महाविकास आघाडीच्या बारामतीत वाजलेल्या फटाक्यामध्ये ना आवाज होता, ना धूर. त्याने फक्त प्रदूषण झाले, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. त्याच वेळी दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर या “बॅटर” या चिन्हावर निवडून आल्या आहेत. शिवसेनेचे तिथे निवङणूक चिन्ह देखील नव्हते. उद्या खासदार कलाबेन डेलकर या भाजपमध्ये आल्या तर बोंबलू नका, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. Barse of another’s children and MP Kalaben Delkar will join BJP !!; Narayan Rane’s storm shot in Mumbai
दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांचे निवडणूक चिन्ह “हातात बॅट घेतलेला बॅटर” हे होते. शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह तिथे नव्हतेच. पण कलाबेन यांच्या विजयाचे श्रेय संजय राऊत घेत आहेत. राज्याबाहेर शिवसेनेचा खासदार निवडून आल्याचे म्हणत आहेत. पण त्यात अजिबात तथ्य नाही. उद्या खासदार कलाबेन जर भाजपमध्ये आल्या तर बोंबलू नका, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीत केलेल्या भाषणात सांगितले होते, की दिवाळीत फटाके फोडू नका. आवाज करू नका आणि धूर सोडू नका. असले बिनआवाजाचे आणि बिनधुराचे फटाके महाविकास आघाडीतच मिळतात. बारामतीतल्या त्यांच्या भाषणात आवाजही नव्हता आणि धूरही नव्हता. होते ते फक्त प्रदूषण, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिवाळीनंतर एकापाठोपाठ एक अटक होईल, असे राजकीय भाकीतही त्यांनी वर्तविले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App