‘बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ ; नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर जोरदार निशाणा साधला


कालीचरण महाराज यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत.’Bapu, we are ashamed, your murderer is alive’; Nawab Malik aimed hard at Kalicharan Maharaj


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींवर आक्षेपाहार्य टीका केल्यामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.त्यामुळे कालीचरण महाराजांवर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे.नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.

नेमक प्रकरण काय आहे

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली.यावेळी कालीचरण महाराज चांगलेच चर्चेत आले आहेत. कालीचरण महाराज यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत.

त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय.कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

‘Bapu, we are ashamed, your murderer is alive’; Nawab Malik aimed hard at Kalicharan Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती