अटक केल्याचा राग बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? छगन भुजबळ यांचा शिवसेना आमदाराला सवाल


विशेष प्रतिनिधी

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर घाईघाईने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा भुजबळ विरुद्ध शिवसेना संघर्ष नाही असेही त्यांनी सांगितले.Balasaheb Thackeray’s family is not angry about the arrest, why only him? Chhagan Bhujbal’s question to Shiv Sena MLA

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई सुरू असल्याचे सांगत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणो त्यांनी केली आहे.यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणालेकांदे सेनेचे म्हणून सेना नेते त्यांच्यासोबत असावेत. राज्यात महाविकास आघाडी असतांना असे आरोप करणे योग्य नाही मी कोणालाही धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो. माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम देत आहे.

भुजबळ म्हणाले, नांदगाव ला 45 कोटी निधी दिला. या वर्षीचा निधी कोरोना साठी वापरा हे सरकारचे निर्देश होते. निधी वाटप हा जिल्हाधिकारी समितीनं घेतला आहे. मी निधी वाटतो हा कांदे यांचा आरोप चुकीचा आहे.

पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणं हे माझं काम आहे यासाठी न्यायालयात जाणे योग्य नाहीआपल्याला पालकमंत्री पदावरून हटवायचे असल्यास मुख्यमंत्र्यांना सांगा.ते शिवसेनेचे आहेत. मुख्यमंत्री हे सेनेचे आहे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटलं तर ते पालकमंत्री बदलतील

Balasaheb Thackeray’s family is not angry about the arrest, why only him? Chhagan Bhujbal’s question to Shiv Sena MLA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय