विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिवसैनिकांना जामीन मंजूर झाला. मोरे व काही सहकारी स्वतः च पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. Bail granted to Shiv Sainiks in Pushback to Kirit Somaiya case
चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रुपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. भाजपचे प्रशांत लट्टे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.दि. ५ फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या हे पुणे महानगर पालिकेमध्ये जंम्बो सेंट्रल मधील घोटाळा संदर्भात पणे महानगर पालिकेचे आयुक्त यांचे भेट घेण्यासाठी आले होते.
शिवसैनिकांनी त्यांना निवेदन देण्यासाठी घेराव घातला होता. त्यांना धक्काबुक्की केली म्हणून शिवसेना शहर अध्यक्षां इतर शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते.आज संबंधितांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवसैनिकांतर्फे ॲड सतिश मुळीक आणि ॲड सचिन हिंगणेकर यांनी युक्तीवाद केला ॲड विकास बाबर यांनी काम पाहिले पाहीले .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App